‘सर्जिकल’ने मोडले ‘तैयबा’चे कंबरडे

पीटीआय
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

सर्वाधिक नुकसान; २० दहशतवादी ठार 

बारामुल्ला/नवी दिल्ली - भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यात (सर्जिकल स्ट्राइक) सर्वाधिक नुकसान लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचे झाले आहे. गुप्तचर संस्थांनी पकडलेल्या रेडिओ संभाषणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, लष्करे तैयबाचे सुमारे २० दहशतवादी भारताच्या कारवाईत मारले गेले. 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाच्या आधारावर तयार करणाऱ्या आलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील दुदनियाल दहशतवादी शिबिरात लष्करे तैयबाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 

सूत्रांनी सांगितले, की दहशतवाद्यांना भारतीय लष्कराकडून कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा नव्हती आणि त्यासाठी ते गाफील राहिले.

अहवालानुसार, भारतीय जवानांनी ज्या वेळी दहशतवाद्यांना मारण्यास सुरवात केली, त्या वेळी ते पाकिस्तानी चौकीकडे पळताना दिसले. सकाळ होताच त्या ठिकाणी पाकिस्तानी लष्कराच्या वाहनांची वर्दळ दिसून आली आणि सर्व मृतदेह तेथून अज्ञातस्थळी नेण्यात आले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना नीलम खोऱ्यात सामूहिकरीत्या दफन करण्यात आल्याचे संकेत रेडिओ संभाषणावरून मिळतात. पूँचसमोरील बलनोई भागात असलेल्या दहशतवादी अड्ड्यांनाही अशाच प्रकारच्या कारवाईचा सामना करावा लागला. या सेक्‍टरमध्ये भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये पाकिस्तानच्या ८ नार्दर्न लाइट इन्फंट्रीचे सैनिकही मारले गेले. 

पाकच्या दोन चौक्‍याही उद्‌ध्वस्त
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकदरम्यान पाच दहशतवादी अड्ड्यांबरोबरच पाकिस्तानी लष्कराच्या दोन चौक्‍याही हल्ल्यात उद्‌ध्वस्त झाल्या असून, त्या ठिकाणी असलेले सर्वजण ठार झाल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाने म्हटले आहे. 

पाक लष्करप्रमुख सीमेवर
इस्लामाबाद : भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी आज पहिल्यांदाच नियंत्रण रेषेला भेट दिली आणि लष्कराच्या सज्जतेविषयी समाधान व्यक्त केले. पाकिस्तान लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे, की शरीफ यांनी हाजी पीर सेक्‍टरला भेट देऊन तेथे तैनात सैनिकांशी संवाद साधला.