30 वर्षे गेली; अजून 30 वर्षे बोफोर्सची चर्चा करत रहा: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

"बोफोर्स प्रकरणाचा त्यांच्याकडून गेली 30 वर्षे उल्लेख करण्यात येत आहे. आणखी 30 वर्षे त्यांना हेच करु देत,'' अशा शब्दांत राहुल यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी त्यांच्या निकटवर्तीयांची निवासस्थानी आणीबाणीची बैठक बोलाविल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - भारतीय लष्करासाठी करण्यात आलेली बोफोर्स तोफा खरेदी व भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या या प्रकरणातील सहभागाबद्दल घडलेल्या नवीन घडामोडींचे संतप्त पडसाद आज (सोमवार) संसदेमध्ये उमटले.

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदारांनी आज लोकसभेमध्ये या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत बोफोर्स गैरव्यवहाराची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी चौकशी करत असलेले स्वीडीश पोलिस अधिकारी स्टेन लिंडस्ट्रॉम यांनी बोफोर्स प्रकरणी "आर्थिक देवाणघेवाण' करण्यासंदर्भात राजीव गांधी व स्वीडनचे तत्कालीन पंतप्रधान ओलोफ पाल्म यांच्यात चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तेव्हा या प्रकरणी झालेल्या कागदपत्रांमधून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे व राजीव गांधी यांचा त्यामध्ये सहभाग असल्याचे उघड होत असल्याची टीका भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी केली. या प्रकरणी चौकशीची मागणी करतानाच भाजप सदस्यांकडून राजीव गांधींसंदर्भात शेरेबाजीही करण्यात आली.

या पार्श्‍वभूमीवर राजीव यांचे पुत्र व कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ""बोफोर्स प्रकरणाचा त्यांच्याकडून गेली 30 वर्षे उल्लेख करण्यात येत आहे. आणखी 30 वर्षे त्यांना हेच करु देत,'' अशा शब्दांत राहुल यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी त्यांच्या निकटवर्तीयांची निवासस्थानी आणीबाणीची बैठक बोलाविल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

या प्रकरणी न्यायालयाने वा सरकारने आदेश दिल्यासच चौकशी करण्याची तयारी सीबीआयकडून दाखविण्यात आली आहे. 1989 मध्ये उघडकीस आलेल्या बोफोर्स प्रकरणाची परिणती तत्कालीन राजीव गांधी सरकार पडण्यात झाल्याचे मानण्यात येते.

देश

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM

अहमदाबाद: अहमदाबाद येथील पालिकेच्या शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीवर वर्गशिक्षकानेच वर्गातच बलात्कार केल्याची घटना पुढे...

06.03 AM

श्रीनगर : "रोहिंग्या मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्याची भाषा करणारे लोक भारतामध्ये राहणाऱ्या तिबेटी सरकारला देश सोडण्यास...

05.03 AM