गांजाचे सेवन ही आपली संस्कृती: उदय चोप्रा; अभिषेक बच्चनचेही समर्थन

uday chopra
uday chopra

मुंबई- मारिजुआना (गांजा) या अमली पदार्थाची लागवड, व्यापार या सर्व बाबी वैध कराव्यात, त्यातून सरकारच्या महसुलात वाढ होईल, असे खळबळजनक ट्‌विट अभिनेता उदय चोप्राने केले होते. त्यावर मुंबई पोलिसांनी गांजाचा व्यापार, सेवन अवैध आहे याची जाणीव ठेवा, अशी समज ट्‌विटवरून चोप्राला समज दिली आहे.
 


उदय याने वरील ट्‌विट केल्यानंतर, त्यातून रोजगाराच्या संधी वाढतील, अशा शब्दांत अभिनेता अभिषेक बच्चन याने त्याचे समर्थन केले. गांजा हा जुन्या काळापासून आपल्या संस्कृतीचा भाग आहे, त्याला कायदेशीर स्वरुप दिल्यास आपल्या महसुलात वाढ होईल. तसेच व्यापाराला मान्यता दिल्यास त्यासंबंधीत गुन्हेगारी देखील संपुष्टात येईल. गांजा वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत, असे चोप्राने ट्‌विटमध्ये म्हटले होते. 

पोलिसांचा इशारा
मुंबई पोलिसांनी उदयच्या ट्‌विटची दखल घेत त्याला सौम्य शब्दांत समज दिली. देशाचे नागरिक म्हणून समाजमाध्यमात मते मांडण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मात्र सध्या गांजाचे सेवन, व्यापार किंवा बाळगणे हे बेकायदा असून त्याबाबत कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे, याचीही जाणीव ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com