पैसे काढण्यावरील मर्यादा जाणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई - बॅंकेतील बचत खात्यांतून पैसे काढण्यावरील मर्यादा 20 फेब्रुवारीपासून आठवड्याला 24 हजारांवरून वाढवून 50 हजार रुपयांवर नेण्यात आली आहे. ही मर्यादा 13 मार्चला पूर्णपणे काढून टाकण्यात येईल, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी दिली.

मुंबई - बॅंकेतील बचत खात्यांतून पैसे काढण्यावरील मर्यादा 20 फेब्रुवारीपासून आठवड्याला 24 हजारांवरून वाढवून 50 हजार रुपयांवर नेण्यात आली आहे. ही मर्यादा 13 मार्चला पूर्णपणे काढून टाकण्यात येईल, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी दिली.

रिझर्व्ह बॅंकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी म्हणाले, ""बॅंकांतील बचत खात्यांतून पैसे काढण्याची मर्यादा सध्या कायम ठेवण्यात आली आहे. नव्या नोटा चलनात येण्याचा वेग पाहून दोन टप्प्यांत ही मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये सुरवातीला 20 फेब्रुवारीला बचत खात्यांतून आठवड्याला 24 हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपये काढता येतील. त्यानंतर 13 मार्चपासून ही मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात येईल.''

नोटाबंदीनंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने एटीएम व बॅंकांतून पैसे काढण्यावर निर्बंध टाकले होते. नोटाबंदीमुळे रोकडटंचाई निर्माण होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. सध्या बचत खात्यांतून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा आहे. चालू खाते, कर्ज खाते आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध याआधीच 1 फेब्रुवारीपासून काढून टाकले आहेत.

नव्या नोटांची बनावट नव्हे, फोटोकॉपी!
""पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा बनावट करणे अवघड आहे. मागील काही काळात या नोटांच्या फोटोकॉपी निदर्शनास आल्या असून, त्या काही बनावट नोटा नाहीत. या फोटोकॉपी सामान्य नागरिकाला सहजपणे ओळखता येत आहेत. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत नाही,'' असे गांधी यांनी नमूद केले.

देश

गुवाहाटी - आसाम राज्यामध्ये झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे गेल्या...

01.18 PM

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होताच 2019 मधील पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिला...

09.51 AM

कोडाईकॅनल (तमिळनाडू) : मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

09.42 AM