लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी आज (गुरुवार) तहकूब करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांना गोंधळास सुरवात केली. समाजवादी पक्षाच्या (सप) सदस्यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या समोर जाऊन कागदपत्रे फाडली. या गोंधळामुळे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. 12 वाजल्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरवात केली. यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

'मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावर माझी असहमती नाही, मात्र त्यासाठी पुर्वतयारी करण्यात आली नाही. शिवाय, सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार असून, जीडीपीवर दोन टक्क्यांपर्यंत परिणाम होईल,' असा अंदाज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री रामनरेश यादव यांच्यासह कर्नाटकमधील डॉ. एम. बालामुरलीकृष्ण यांच्या निधनाची सूचना दिली. शिवाय, अफगणिस्तानची राजधानी काबूल येथे मशिदीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत शोक व्यक्त केला. यानंतर संसदेथील सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहात प्रार्थना केली. मात्र, यानंतर अध्यक्षांनी कामकाजास सुरवात करताच विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरवात केली.

Web Title: lok sabha adjourned for the day