लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे आरक्षणावर प्रश्नचिन्ह

lok sabha speaker sumitra mahajan opposes reservation
lok sabha speaker sumitra mahajan opposes reservation

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर बोलताना शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रांचीमध्ये सुरू असलेल्या चार दिवसीय लोकमंथन कार्यक्रम सुरु आहे यावेळी त्या बोलत होत्या. तसेच, त्यांनी सांगितले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं होतं, की आरक्षण फक्त 10 वर्षांकरिता आवश्यक आहे. आरक्षणानं देशाचं कल्याण होणार आहे काय? असेही त्या म्हणाल्या.

महाजन पुढे म्हणाल्या की, देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्यात देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. संसद आरक्षण वाढवत चाललं आहे. प्रत्येक वेळी 10 वर्षांसाठी आरक्षण वाढवलं जातंय. असे कधीपर्यंत चालणार आहे. या आरक्षणाची मुदत वाढवण्यामागे काय विचार आहे. आमच्यासाठी सर्व धर्म समान आहेत. आज देशाला आणि समाजाला तोडणारी ताकद सक्रिय आहे. आदिवासींचं धर्म परिवर्तन केलं गेलं. परंतु आमच्या सरकारनं धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला. तसेच आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येऊन विचारविनिमय करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाजन यांनी यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या भाषणाचाही उल्लेख केला. देशाचा विचार सर्वात पहिला यायला हवा, लोकांनी जन, गण, मनसंदर्भात विचार करायला हवा, लोकांना देशाचा इतिहास आणि साहित्यासंदर्भात माहिती असायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com