लोकसभेच्या संकेतस्थळावर येडियुरप्पा अद्यापही खासदारच

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

लोकसभेच्या संकेतस्थळावर सध्या कार्यरत असलेल्या खासदारांची त्यांच्या नावासह कार्यकाळाची माहिती दिली जाते. मात्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे नाव लोकसभेच्या संकेतस्थळावर खासदारांच्या यादीमध्ये दिसत आहे.  

नवी दिल्ली : लोकसभेच्या संकेतस्थळावर सध्या कार्यरत असलेल्या खासदारांची त्यांच्या नावासह कार्यकाळाची माहिती दिली जाते. मात्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे नाव लोकसभेच्या संकेतस्थळावर खासदारांच्या यादीमध्ये दिसत आहे.  

18 मे, 2018 ला लोकसभेत भाजपचे 271 खासदार होते. त्यानंतर 23 मे, 2018 ला ही संख्या तीनने वाढून 274 झाली. तसेच 18 मेला लोकसभेच्या रिक्त जागेची संख्या 7 दाखविण्यात येत होती. मात्र, आता ही संख्या 5 करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर लोकसभा सचिवालय खडबडून जागे झाले आहे. सचिवालयाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच संकेतस्थळावर चुकीची माहिती दिली जात असल्याचे निर्देशनास आल्यानंतर संकेतस्थळ दुरुस्तीसाठी काम केले जात आहे.

बी. एस. येडियुरप्पा आणि श्रीरामुलू या दोन्ही खासदारांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे पत्रही प्राप्त झाले होते. हे पत्र लोकसभेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धही करण्यात आले होते. मात्र, तीन महिन्यानंतर याबाबतची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, याबाबत सचिवालयाने सांगितले, की संकेतस्थळामध्ये बिघाड झाला आहे. संकेतस्थळावर चुकीची माहिती देण्यात आली असून, ही चुक दुरुस्त करण्यात येत आहे.

Web Title: Lok Sabha Website Made Yeddyurappa As A Parliamentarian Messed Up