2014 पासून लोकसभा पोटनिवडणुकांत भाजप फक्त 6 जागांवर विजयी

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

नवी दिल्ली : आत्तापर्यंत झालेल्या पोटनिवडणुका भाजपसाठी लाभाच्या ठरल्या नाहीत. मात्र, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची रणनीति कामी येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

2014 मध्ये लोकसभेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आल्या होत्या. या पाचपैकी 2 जागांवर भाजपचा विजय झाला. तसेच 2015 मध्ये 3 पैकी एकही जागा भाजपला जिंकता आली नाही. 2016 मध्ये 4 पैकी 2 जागांवर विजय मिळाला. तर 2017 मध्ये लोकसभेच्या 4 जागांपैकी एकही जागा भाजपला जिंकता आली नाही. त्यानंतर आता मे 2018 मध्ये लोकसभेच्या 8 जागांपैकी 2 जागांवर विजय मिळाला आहे. या सर्व पोटनिवडणुकांमधील 24 जागांपैकी फक्त 6 जागा भाजपला जिंकता आल्या. त्यामुळे या पोटनिवडणुका भाजपसाठी लाभदायक नसल्याचे यातून दिसत आहे.  

Web Title: Loksabha Bypoll Election out of 24 seats BJP Gets 6 seats