बेपत्ता महिलेची विक्री; दोघांकडून बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

फूल सिंग नावाच्या व्यक्तीने मदत करण्याच्या बहाण्याने महिलेची 40 हजार रुपयांना अवदेश जातवला विक्री केली.

कानपूर- इटावा रेल्वेस्टेशनवर चुकामूक झालेल्या महिलेची 40 हजार रुपयांना विक्री केल्यानंतर दोघांनी बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बिहारमधील पीडित महिला नातेवाईकांसोबत रेल्वेने शिमला येथे राहात असलेल्या एका नातेवाईकाकडे निघाली होती. इटावा रेल्वे स्थानकावर पीडित महिला अन्‌ तिच्या नातेवाईकांची चुकामूक झाली होती. फूल सिंग नावाच्या व्यक्तीने मदत करण्याच्या बहाण्याने महिलेची 40 हजार रुपयांना अवदेश जातवला विक्री केली. महिलेने जातवकडून सुटका करून घेतली अन्‌ गावाकडे निघाली होती. यावेळी अरविंद व विश्राम नावाच्या दोन युवकांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिला तिच्या गावात दाखल झाली. महिलेची अवस्था पाहून ग्रामस्थांनी पुढे येत गुन्हा दाखल केला.'

'महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, अहवाल अद्याप हाती आलेला नाही. पीडित महिलेने दिलेल्या माहितीवरून दोघांचा तपास सुरू आहे,' अशी माहिती पोलिस अधिकारी संतोष कुमार अवस्थी यांनी दिली.