प्रत्येक अर्थमंत्र्याला व्याजदर कमी असावेत असेच वाटते

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

अरुण जेटली यांचे मत; रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाचा आदर

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपात होईल, अशी अपेक्षा मला होती मात्र, रिझर्व्ह बॅंकेने "जैसे थे' भूमिका घेतली. बॅंकेच्या या निर्णयाचा मी आदर करतो, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी व्यक्त केले.

अर्थसंकल्पानंतर होणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या बैठकीला जेटली उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले, ""प्रत्येक अर्थमंत्र्यांची इच्छा असते की व्याजदर कमी असावेत. परंतु, अखेरीस तुम्हाला रिझर्व्ह बॅंकेचा निर्णय मान्य करावा लागतो. या बैठकीत सदस्यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले. हे प्रश्‍न सरकारच्या मनात नेमके काय आहे, याविषयी होते. सरकारच्या मनात "इलेक्‍टोरल बॉंड'चा मुद्दा असून, त्याविषयी मी विस्ताराने त्यांना माहिती दिली आहे.''

रिझर्व्ह बॅंकेने सलग दुसऱ्या पतधोरण आढाव्यात व्याजदर कपात करणे टाळले आहे. नोटाबंदीचा परिणाम आणि चलनवाढ या दोन्हींबाबत पुरेशी स्पष्टता येईपर्यंत व्याजदराबाबत "जैसे थे' भूमिका रिझर्व्ह बॅंकेने घेतली आहे. तसेच, नजीकच्या काळात व्याजदर कपातीची शक्‍यताही फेटाळून लावली आहे.

Web Title: Low interest rates seem to be the same every minister