एलपीजीच्या दरात 2.07 रुपये वाढ 

पीटीआय
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - स्वयंपाकाच्या अंशदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 2.07 रुपये वाढ गुरुवारी करण्यात आली असून, मागील सहा महिन्यांतील ही सातवी दरवाढ आहे. विनाअंशदानित एलपीजीची प्रतिसिलेंडर 54.5 रुपये दरवाढ करण्यात आली असून, त्याची किंमत आता 584 रुपयांवर गेली आहे. दरम्यान, विमान इंधनाच्या दरात 3.7 टक्के कपात करण्यात आली आहे. 

अंशदानित एलपीजीच्या 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 430.64 पैसे होती. आता त्यासाठी 432.71 पैसे मोजावे लागतील. एलपीजी सिलेंडवरील अंशदान कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे जुलैपासून सरकारने अंशदानित एलपीजी सिलेंडरची दरमहा किमान दोन रुपयांपर्यंत दरवाढ सुरू केली आहे. आज झालेली दरवाढ ही मागील सहा महिन्यांतील सातवी आहे. याआधी 1 नोव्हेंबरला एलपीजीची प्रतिसिलेंडर 2.05 रुपये दरवाढ करण्यात आली होती. त्याआधी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी प्रतिसिलेंडर 1.5 रुपये दरवाढ झाली होती, तसेच 1 ऑक्‍टोबरला प्रतिसिलेंडर 2.03 रुपये दरवाढ करण्यात आली होती.