ले.जनरल झा यांनी सूत्रे स्वीकारली

पीटीआय
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

ले.जनरल झा यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि "आयएमए'चे माजी विद्यार्थी आहेत. 13 डिसेंबर 1980 रोजी 17 व्या शीख रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली

डेहरादून - भारतीय लष्करी अकादमीचे (आयएमए) 48 वे प्रमुख (कमांडंट) म्हणून लेफ्टनंट जनरल संजय कुमार झा यांनी सोमवारी सूत्रे हाती घेतली.

ले.जनरल झा यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि "आयएमए'चे माजी विद्यार्थी आहेत. 13 डिसेंबर 1980 रोजी 17 व्या शीख रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. राष्ट्रीय रायफल्स बटॅलियन, आसाम रायफल्स आणि ईशान्येकडील माउंटन विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

उत्कृष्ट कामगिरी व सवेबद्दल झा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.