लखनौमध्ये डेंग्युच्या बळींच्या संख्या 148 वर

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

लखनौ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमध्ये डेंग्युची साथ पसरली असून केवळ लखनौमध्ये आणखी सात जणांचा मृत्यु झाल्याने शहरात डेंग्युमुळे मृतांची संख्या 148 वर पोचली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमध्ये डेंग्युची साथ पसरली असून केवळ लखनौमध्ये आणखी सात जणांचा मृत्यु झाल्याने शहरात डेंग्युमुळे मृतांची संख्या 148 वर पोचली आहे.

शुक्रवारी शहरातील विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या 1800 जणांच्या चाचण्यांमध्ये किमान 54 रुग्णांना डेंग्यु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान राज्याचे मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालयासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असल्याचे वृत्त आहे. 'आम्हाला आशा आहे की तापमान लवकरच कमी होईल आणि डेंग्युसह अन्य आजारांची साथ संपुष्टात येईल', अशी माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच थंड हवामानात डेंग्युचे डास जगू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

डेंग्यु प्रतिबंधक उपाययोजना -

  • घरातील व परिसरातील पाणी साठण्याची ठिकाणे नष्ट करावी.
  • नागरिकांनी आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत.
  • पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावे.
  • घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.
  • घरांच्या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकाऊ व भंगार साहित्य ठेऊ नये. 
Web Title: Lucknow in grip of Dengue Death toll reaches 148