अखिलेश यादव मुलायम यांच्या दारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज आपले पिताश्री मुलायमसिंह यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, तसेच पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले. समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 5 आक्‍टोबर रोजी होणार असल्याची माहिती आमदार सुनीलसिंह यांनी दिली.

दरम्यान, मुलायम अखिलेश यांच्या बैठकीत नेमका कोणता विषय चर्चिला गेला याबाबत मात्र सुनीलसिंह यांनी भाष्य करणे टाळले. तत्पूर्वी 23 सप्टेंबर रोजी झालेल्या समाजवादी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी मात्र मुलायम आणि शिवपाल यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. दरम्यान, मुलायमसिंह यादव हे लोकदलाशी हातमिळवणी करत नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मुलायम यांच्या नव्या पक्षाच्या नावातील "समाजवादा'चा टॅग कायम राहणार आहे.