गायत्री प्रजापती निर्दोष : मुलायमसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

भाजप राजकीय सूड उगवत असल्याचा घणाघाती आरोप

लखनौ: समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज त्यांचे माजी सहकारी आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेले मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांची भेट घेतली. या वेळी मुलायमसिंह यांनी प्रजापती निर्दोष असल्याचे सांगितले.

भाजप राजकीय सूड उगवत असल्याचा घणाघाती आरोप

लखनौ: समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज त्यांचे माजी सहकारी आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेले मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांची भेट घेतली. या वेळी मुलायमसिंह यांनी प्रजापती निर्दोष असल्याचे सांगितले.

प्रजापती यांना दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात असून, हा प्रकार पंतप्रधान मोदींच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
प्रजापती यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरावा नाही. तरीही त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे, यामागे राजकीय षड्‌यंत्र आहे, असे सांगत मुलायमसिंह म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून हा राजकीय सूड उगवला जात आहे. याप्रकरणी आपण पंतप्रधानांची भेट घेणार असून, वेळप्रसंगी राष्ट्रपतींनाही भेटू, असे त्यांनी या वेळी सांगितले. मुलायम यांनी एक तासभर प्रजापती यांच्याशी चर्चा केली.

प्रजापती यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे प्रतिबंध कायद्यासह (पॉस्को) इतर सहा प्रकारचे गुन्हे 3 जुलै रोजी न्यायालयात दाखल करण्यात करण्यात येणार आहेत. प्रजापती यांच्यावर 18 फेब्रुवारी 2017 रोजी गौतमपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने त्यांच्या अटकेचे आदेश निघाले होते. प्रजापती यांनी वारंवार बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने केली होती. तसेच प्रजापती यांनी पीडितेच्या मुलीचाही विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली होती.

"त्या' मुलींनाही दहशतवाद्याप्रमाणे वगणूक
मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नुकतेच काही मुलींनी काळे झेंडे दाखविले होते. लोकशाहीमध्ये काळे झेंडे दाखविण्याचा अधिकार आहे. मात्र, संबंधित मुलींनाही दहशतवाद्याप्रमाणे वागणूक मिळत असल्याचा आरोप मुलायम यांनी या वेळी केला.