प्रजापतीसह सहा जणांविरुद्ध बलात्कारप्रकरणी आरोप निश्‍चित

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

लखनौ: येथील एका पोस्को विशेष न्यायालयाने उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि अन्य सहा जणांविरुद्ध सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोप निश्‍चित केले आहेत. फिर्यादींचे आरोप तपासण्यासाठी न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी 2017 ही तारीख निश्‍चित केली आहे. या प्रकरणी सर्व आरोपी हे तुरुंगात असून कडक सुरक्षा व्यवस्थेत सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने गायत्री आणि अन्य आरोपी विकास, आशिष, अशोक अमरेंद्र, चंद्रपाल आणि रूपेश्‍वर यांच्यावर भारतीय दंडसंहितेनुसार आरोप निश्‍चित केले आहेत. विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती उमा शंकर शर्मा यांनी यापूर्वीच आरोपी विकास वर्मा याचा सुटकेचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे आढळून आले आहेत. पीडित महिलेने 18 फेब्रुवारी 2018 रोजी गौतमपाळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तीन जून 2017 रोजी 824 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.