बनावट "आधार'प्रकरणी "मास्टरमाइंड'ला अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

लखनौ: बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या टोळीच्या मास्टरमाइंडला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) अटक केली असल्याचे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. दुर्गेशकुमार मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा मध्य प्रदेशातील राहणारा आहे.

मिश्रा याला "एसटीएफ'ने मंगळवारी अटक केले. बोटांचे बनावट ठसे तयार करून त्या साहाय्याने आधार कार्ड तयार करणाऱ्या टोळीचा मिश्रा हा मास्टरमाइंड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आधार कार्ड तयार करणाऱ्या भारतीय नागरिकांक प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) नियमांचे उल्लंघन करून बनावट आधार कार्ड तयार केल्याचा आरोप मिश्रावर आहे.

दहा सप्टेंबर रोजी दहा जणांना अटक करत "एसटीएफ'ने बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लावला होता. बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी या टोळीतील सदस्य स्वतःच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या छायाचित्रांचा वापर करत होते. "यूआयडीएआय'च्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात लखनौमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर "एसटीएफ'ने ही कारवाई केली आहे.

बोटांच्या बनावट ठशांचा वापर
"यूआयडीएआय'साठी आधार कार्ड तयार करण्याचे काम करणाऱ्या खासगी संस्थेत मिश्रा हा सहायक व्यवस्थापक म्हणून काम करत होता. "यूआयडीएआय'च्या सॉफ्टवेअरमध्ये हस्तक्षेप करत बोटांच्या बनावट ठशांच्या आधारे आधार कार्ड तयार करण्याची माहिती मिश्रा याने कानपूरमधील सौरभसिंह याला दिली होती. सौरभसिंह याला यापूर्वीच अटक झाली आहे, अशी माहिती "एसटीएफ'च्या अधिकाऱ्याने दिली.