राष्ट्रपतिपदाचे उमेदवार कोविंद घेणार आमदारांची भेट

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

लखनौ: राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे उद्या (ता.25) रोजी लखनौमध्ये येणार असून येथे ते नवनिर्वाचित आमदारांकडे पाठिंब्याची मागणी करतील. राष्ट्रपतिपदासाठी 17 जुलै रोजी मतदान होत असून, यासाठी भाजपने आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवार मीराकुमार यासुद्धा आमदारांची भेट घेणार असल्याचे एका कॉंग्रेस नेत्याने सांगितले. पक्षाच्या पर्यादा ओलांडत मीरा कुमार या सर्व आमदारांची भेट घेणार असून, त्यांच्यासोबत गुलाम नबी आझाद हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

. . . .