तोंडी तलाक प्रतिक्रिया: महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल: आदित्यनाथ

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

"आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या मुस्लिम भगिनींना पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार.
- अनुपमा जैसवाल, मंत्री, उत्तर प्रदेश

लखनौ: मुस्लिम समाजातील तोंडी तलाक घटनाबाह्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशच्या सरकारने स्वागत केले आहे. हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणासाठी "मैलाचा दगड' ठरणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

तोंडी तलाक देऊन पत्नीला घटस्फोट देण्याची पद्धत बेकायदा, घटनाबाह्य व निरर्थक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एकमताने घेतलेला हा निर्णय मोठा आहे. महिलांना न्याय मिळण्याची ही सुरवात आहे. यासंदर्भातील पुढील कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येईल. ""एखाद्याला न्यायापासून फार काळ वंचित ठेवता येणार नाही. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे,'' असेही ते म्हणाले. तोंडी तलाकवरील बंदीबाबत नवीन कायद्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले,"" केंद्राने याविषयी न्यायालयात मत मांडले आहे आणि त्याबाबत कोणताही गोंधळ नाही.''

"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक आहे. लिंगावर आधारित भेदभाव न करता समानतेला पाठिंबा देण्याची भूमिका भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. या निर्णयामुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेला बळकटी मिळेल.
- सिद्धार्थनाथ सिंह, राज्याचे आरोग्यमंत्री व सरकारचे प्रवक्त