योगी आदित्यनाथ यांचे "हंड्रेड डेज'

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

यूपीतील रस्ते खड्डेमुक्त करणार; कामगिरीचा घेतला आढावा

लखनौ: कोणत्याही कार्यासाठी शंभर दिवसांचा कालावधी हा कमी आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील विविध समस्यांचे आव्हान स्वीकारत केलेल्या भरीव कामगिरीबाबत आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाधान व्यक्त केले.

यूपीतील रस्ते खड्डेमुक्त करणार; कामगिरीचा घेतला आढावा

लखनौ: कोणत्याही कार्यासाठी शंभर दिवसांचा कालावधी हा कमी आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील विविध समस्यांचे आव्हान स्वीकारत केलेल्या भरीव कामगिरीबाबत आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाधान व्यक्त केले.

उत्तर प्रदेश सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री केशव मोर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. या वेळी आदित्यनाथ यांनी सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला आणि भविष्यातील रोडमॅपही सांगितले.

आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकार मोदी सरकारच्या मार्गाने काम करत आहे. आपले सरकार "सबका साथ, सब का विकास' या तत्त्वाने काम करत आहे. गेल्या पंधरा वर्षांत यूपीची स्थिती बिघडली होती. यूपी सरकार सामान्य जनतेसाठी कल्याणकारी काम करत आहे. कोणताही भेदभाव मनात न ठेवता सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले. आरोग्य, सकस आहार, गृहनिर्माण, पाणी याबरोबरच कायदा सुव्यवस्था आणि शिक्षणावर काम करत आहे.

आदित्यनाथ सरकारचे ठळक मुद्दे

 • 2017 वर्ष गरीब कल्याण वर्ष म्हणून घोषित
 • ऊस उत्पादकांना 22517 कोटी रुपये प्रदान
 • पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ
 • 86 लाख शेतकऱ्यांना फायदा; 36 हजार कोटींचा खर्च
 • खाण धोरणसाठी ई-पोर्टल धोरण लागू
 • 1 लाख 21 हजार किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त करणार
 • सर्वच जिल्ह्याचे ठिकाणी 24 तास वीजपुरवठा : ग्रामीण भागात 18 तास वीज
 • अयोध्या, शाकुंभरी देवीसारख्या धार्मिक स्थळी 24 तास वीज
 • यूपी-राजस्थानमध्ये आंतरराज्यीय करार : भूमाफियाविरुद्ध अँटी भूमाफियाची तरतूद
 • व्हीआयपी कल्चर संपवले: राज्यात अँटी रोमिओ पथकाची नियुक्ती
 • हिलांसाठी 181 नंबरची चोवीस तास हेल्पलाइन