मुस्लिम कुटुंबाने दिली हनुमान मंदिराला जमीन

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

शिवपूर: देशाच्या अनेक भागात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना मध्य प्रदेशात मात्र धार्मिक सलोख्याचे एक आगळे उदाहरण समोर आले आहे. येथील एका मुस्लिम कुटुंबाने गावच्या हनुमान मंदिरासाठी आपली जमीन दान दिली आहे.

शिवपूर जिल्ह्यातील बगवाज या गावातील जावेद अन्सारी यांनी हनुमान मंदिराच्या विस्तारीकरणासाठी 1905 चौरस फूट जमीन दिली आहे. मंदिराच्या समितीकडे जागा दान करीत असल्याचे पत्र त्यांनी दिल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी आर. बी. सिंडोसकर यांनी दिली. या जमिनीचा वापर भाविकांना बसण्यासाठी तसेच मंदिराभोवती कुंपण भिंत घालण्यासाठी केला जाणार आहे.

याबाबत बोलताना जावेद अन्सारी म्हणाले,""धार्मिक सौहार्दाचा संदेश देण्यासाठी आपण मंदिरासाठी ही जमीन दिली आहे. अशा घटनांमुळे हिंदू - मुस्लिमांमधील बंधुभाव वाढीस मदत होईल.''

मंदिर समितीचे अध्यक्ष राजू वैश म्हणाले,""जावेद अन्सारी यांनी त्यांचे बंधू परवेझ, शाहनाज, शोएब, शादाब यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. त्यांची जागा आता मंदिराला मिळाली आहे.''