कैद्याबरोबर बैठक घेणाऱ्या मंत्र्यांना अपात्र ठरवावे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मद्रास उच्च न्यायालयाची मुख्यमंत्र्यांना नोटीस

मदुराई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांच्याबरोबर बैठक घेतलेल्या मंत्र्यांना अपात्र ठरवावे, यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीसामी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील चार जणांना नोटीस बजाविली आहे.

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मुख्यमंत्री पलानीसामी यांना नोटीस पाठवून त्यांनी आपल्या मंत्र्यांना याबाबत का विचारणा केली नाही याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. अण्णा द्रमुकचे दिवंगत आमदार थमरकानी यांचा मुलगा अनझागन याने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायाधीश के. के. ससिधरन आणि जी. आर. स्वामिनाथन यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील के. ए. सेनगोत्तायन, डिंडीगुल श्रीनिवासन, कामराज आणि सेल्लूर के. राजू आणि विधानसभेचे सचिव यांना नोटीस बजाविली आहे. तुरुंगात कैद्याबरोबर बैठक घेणे, हे मंत्रिपदाच्या शपथेचे उल्लंघन असून त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 14 फेब्रुवारी रोजी शशिकला यांना दोषी ठरवून त्यांची रवानगी बंगळूरच्या तुरुंगात केली आहे.