'युपी'तील मदरशातून होतेय गोहत्या बंदीची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

देशभरात गोहत्या बंदीबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना धर्म बाजूला ठेऊन उत्तर प्रदेशमधील एका मदरशातून गोहत्या बंदीची मागणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड लिहून मागणी करण्यात आली आहे.

संभाल (उत्तर प्रदेश) - देशभरात गोहत्या बंदीबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना धर्म बाजूला ठेऊन उत्तर प्रदेशमधील एका मदरशातून गोहत्या बंदीची मागणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड लिहून मागणी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील संभाल येथील अलिजान जमियत उल मुस्सलम एज्युकेशनल सोसायटी संचलित मौलाना मोहम्मद अली जौहर मदरशातून गेल्या सहा वर्षांपासून गोहत्या बंदीची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात मदरशाच्या सदस्यांनी अलिकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांची भेट घेतली. 'जर गोहत्या बंदी केली नाही तर येणाऱ्या पिढ्यांना दूध मिळणार नाही. पुढील पिढीला गायी आणि बैल केवळ पाठ्यपुस्तकाच बघायला मिळतील', अशी चिंता मदरश्‍याचे व्यवस्थापक फिरोज खान यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मांस निर्यातीवर बंदी आणावी, संपूर्ण देशात गोहत्या बंदी करावी, गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे, या संदर्भातील कायदा करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.