महात्मा गांधींचे नातू कनुभाई यांचे निधन 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - महात्मा गांधींचे नातू कनुभाई रामदास गांधी यांचे सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरत येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कनुभाई यांनी "नासा'मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपूर्वी ते कृत्रिम श्वासोच्छवासावर होते. हृदयविकार व पक्षाघात आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कनुभाईंच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

सध्या कनुभाई आपल्या बहिणीकडे बंगळूरमध्ये राहत होते. प्रकृती बिघडल्यामुळे ते सुरतला आले होते. ते सुरत येथील राधाकृष्ण मंदिरातील संत निवास येथे राहत होते. तीन वर्षांपूर्वीच ते अमेरिकेतून भारतात परतले होते. प्रारंभी त्यांनी दिल्ली, वर्धा, नागपूर येथे वास्तव्य केले. त्यानंतर ते सुरत येथील वृद्धाश्रमात काही महिने राहिले होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते आपल्या पत्नीबरोबर सुरत येथील राधाकृष्ण मंदिरात राहत होते. 

मार्च-एप्रिल 1930च्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहादरम्यान गुजरातच्या दांडी गावाच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी हाती घेतलेल्या काठीचे एक टोक धरून पुढे चालणारा मुलगा म्हणून कनु प्रसिद्ध होते.