अहमदाबाद विमानतळावर दोन विमानांची टक्कर टळली

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

इंडिगोच्या विमानाचा मागील भाग धावपट्टीवरच असल्याने वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला या प्रकाराची माहिती दिली; परंतु वैमानिकाला पार्किंगकडे जात असताना अचानक धावपट्टीवर ससा आल्याने ब्रेक लावावा लागला, असे इंडिगोच्या अहवालात म्हटले आहे

अहमदाबाद - अहमदाबाद विमानतळावर शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. धावपट्टीवर अचानक ससा आल्याने स्पाइसजेट आणि इंडिगो विमानाची टक्कर होता होता राहिली.

स्पाइसजेट उड्डाण घेत असताना त्याचवेळी इंडिगो एअरलाइन्सचे विमान पार्किंगकडे जात होते; परंतु इंडिगोचे विमान अजूनही धावपट्टीवरच असल्याचे पाहून स्पाइसजेटचा वैमानिकाची गाळण उडाली. कारण इंडिगोच्या विमानाचा मागील भाग धावपट्टीवरच असल्याने वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला या प्रकाराची माहिती दिली; परंतु वैमानिकाला पार्किंगकडे जात असताना अचानक धावपट्टीवर ससा आल्याने ब्रेक लावावा लागला, असे इंडिगोच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे विमानाचा मागील भाग रनवेवरच होता. दुसरीकडे स्पाइसजेटच्या वैमानिकाने अहवालात म्हटले, की इंडिगोच्या विमानाला टेक-ऑफच्या रनवेपासून बाजूला होण्याची परवानगी मिळाली नव्हती. या घटनेची डीजीसीए चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

07.48 PM

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी...

07.36 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM