ईशान्येकडील राज्यात टीएमसीचा काँग्रेसला पुन्हा धक्का

Sonia Gandhi Mamata Banerjee
Sonia Gandhi Mamata Banerjeeesakal
Summary

ईशान्येकडील राज्यात टीएमसीनं काँग्रेसला पुन्हा धक्का दिलाय.

ईशान्येकडील मेघालय (Meghalaya) राज्यात टीएमसीनं काँग्रेसला (TMC Congress Party) पुन्हा धक्का दिलाय. उत्तर गारो हिल्स (North Garo Hills) जिल्ह्यातील आदिवासी परिषदेचे (Tribal Council) 11 काँग्रेस (Congress Party) सदस्य तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळं या परिषदेत काँग्रेसऐवजी टीएमसी आता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आलाय. इतकंच नाही, तर काँग्रेसकडं केवळ 11 सदस्य होते आणि आता त्या सदस्यांनी पक्षाची साथ सोडल्याने काँग्रेसची सदस्य संख्या शून्यावर आलीय. या जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. या परिषदेत भाजप आणि त्याचा मित्रपक्ष एनपीपीचे एकूण 19 सदस्य आहेत. यापैकी भाजपकडं केवळ 2 सदस्य आहेत.

Sonia Gandhi Mamata Banerjee
Political News : खासदार उदयनराजे भाजपलाही नकोसे?

मेघालय तीन स्वायत्त आदिवासी विकास परिषदांमध्ये विभागलं गेलंय. यात खासी, जयंतिया आणि गारो स्वायत्त परिषदा आहेत. काँग्रेस सदस्यांना पक्षात सामील केल्यानंतर, TMC च्या राज्य युनिटनं ट्विटरवर लिहिलंय, 11 सदस्य आमच्या कुटुंबात सामील झालेत, हा आमच्यासाठी खूपच खास दिवस आहे. आम्ही सर्वांचं पक्षात मनापासून स्वागत करतो. नुकतेच टीएमसीमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा (Mukul Sangma) यांनीही त्यांचं स्वागत केलंय. टीएमसीनं लिहिलंय, की ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) नेतृत्वाखाली आम्ही राज्याच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्यासाठी काम करू, असं नमूद केलंय.

Sonia Gandhi Mamata Banerjee
'आमदार शिंदेंना थंड करुन घरी बसवण्याची ताकत आमच्यात'

17 पैकी 12 आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर, दोन आठवड्यांनंतर नॉर्थ गारो हिल्स जिल्ह्यात काँग्रेसमध्ये फूट पडलीय. मुकुल संगमा यांच्यासह 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाल्याने राज्यात काँग्रेसला आधीच मोठा धक्का बसला होता. बंगालमध्ये पुन्हा एकदा सत्तेत आल्यापासून तृणमूल काँग्रेस देशातील अनेक राज्यांमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसलाय. गोवा, बिहार, हरियाणा, यूपीसह अनेक राज्यांमध्ये टीएमसीनं काँग्रेस नेत्यांना फोडून आपल्या पक्षात सामील केलंय.

Sonia Gandhi Mamata Banerjee
'औरंगजेबनं 400 हून अधिक मंदिरांसाठी जमीन केली होती दान'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com