‘बिग बॉस’च देशाचे पंतप्रधान - ममता बॅनर्जी

उज्ज्वलकुमार -सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पाटणा - बिग बाजारचे ‘बिग बॉस’च देशाचे पंतप्रधान झाले आहेत. यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील लोक त्रस्त झाले आहेत, असा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथे केला. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याकडून कानमंत्र घेत ममतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

पाटणा येथे नोटाबंदीच्या विरोधातील आंदोलनात त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी केंद्राने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येण्याचा सरकारचा सिद्धांत आमच्या लक्षातच येत नसून लोक पैशाविना मरत आहेत, हे मात्र आम्हाला स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या आंदोलनात राजदमधून हकालपट्टी झालेले पप्पू यादव देखील सहभागी झाले होते. काल संध्याकाळी उशिरा ममता बिहारमध्ये आल्या येथे त्यांनी लालू आजारी असल्याचे समजताच त्यांची भेट घेतली. यावेळी राबडीदेवी यांच्यासह तेजस्वी यादव देखील  उपस्थित होते.

नोटाबंदीबाबत प्रत्येक पक्षाचा आपला दृष्टिकोन आहे, त्यामुळे नितीशकुमार यांनी याला समर्थन दिल्याबाबत आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही आमचे काम करत आहोत आणि ते त्यांचे. 

- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल