'तृणमूल'च्या अध्यक्षपदी ममता बॅनर्जींची फेरनिवड

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शुक्रवारी फेरनिवड झाली. ही निवड सहा वर्षांसाठी असेल.

पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीनंतर उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची याबाबत घोषणा केली. या प्रसंगी ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. फेरनिवडीनंतर त्या म्हणाल्या की, पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अन्य कोणाला दिली असती, तर ते अधिक योग्य झाले असते. कार्यकर्ता म्हणून काम करण्यास मला आवडते. कारण नेते नाही, तर कायकर्ते हेच पक्षाची संपत्ती आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्ष नागरिकांसाठी काम करतो.