विना मेक-अप पत्नीला पाहताच दिला घटस्फोट

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

विना मेक-अप आपल्या पत्नीला पाहिल्यावर त्याला धक्का बसला. विवाहावेळी आपली पत्नी खूपच सुंदर दिसत होती पण मेक-अप गेल्यानंतर फारच कुरुप दिसत असल्याचा आरोप करत पत्नीला घटस्फोट दिला.

दुबई- एका नवविवाहीत जोडपे पोहण्यासाठी पाण्यात गेले अन् पत्नीचा मेक-अप धुवून गेला. विना मेक-अप पत्नीला पाहताच नवऱयाला धक्का बसला अन् त्याने घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली.

सौदी अरेबियामधील नवविवाहित जोडपे अल मामझारच्या किनाऱयावर गेले होते. यावेळी 34 वर्षीय नवरा व त्याची 28 वर्षाची पत्नी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्यात पत्नीचा मेक-अप धुवून गेला. विना मेक-अप आपल्या पत्नीला पाहिल्यावर त्याला धक्का बसला. विवाहावेळी आपली पत्नी खूपच सुंदर दिसत होती पण मेक-अप गेल्यानंतर फारच कुरुप दिसत असल्याचा आरोप करत पत्नीला घटस्फोट दिला आहे, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

पत्नीने प्लॅस्टिक सर्जरी करुन व मेक-अप करून आपल्याला फसवल्याचा आरोपही पतीने केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थीतीत आपण पत्नीला स्वीकारणार नाही, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, घटस्फोटाचा धक्का बसल्याने महिलेवर मानोपसचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहे. आपण सुंदर दिसावे यासाठी चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी केल्याची माहिती विवाहापूर्वीच पतीला देणार होते. परंतु, भितीमुळे हे लपवल्याचे पत्नीने कबूल केले आहे.

टॅग्स