अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी बापास अटक

Man held on charges of impregnating 16 year old daughter in north Bengal
Man held on charges of impregnating 16 year old daughter in north Bengal

सिलगुरी : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी नराधम बापास उत्तर बंगाल पोलिसांनी अटक केली. या मुलीच्या बापाला पश्चिम बंगालच्या अलिपूरदौर जिल्ह्यातील जयगाव गावातून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

आरोपीची 37 वर्षीय पत्नी भूतान येथे स्थलांतरित कामगार आहे. तिला 15 जुलैला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तिने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. भारत सोडून जात असताना त्याला तीन दिवसानंतर भूतान सीमेवर अटक करण्यात आली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की यातील आरोपीला तीन अपत्य आहेत. त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तो देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. तत्पूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीला कूच बेहार येथील शासकीय गृहात पाठविण्यात आले असून, 5 ऑक्टोबरपर्यंत तिची प्रसूती होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिसवास यांनी दिली. 

यातील आरोपीविरोधात बाललैंगिक संरक्षण कायदा (पॉस्को) कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला कारागृहात पाठविले आहे.  

आरोपीची पत्नी कामानिमित्त दिल्लीमध्ये वास्तव्यास होती. आरोपी घरी कोणी नसल्याचा वेळोवेळी फायदा घेत होता. यातच त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला, अशी माहिती अलिपूरदौर मनाबिक मुख या स्वयंसेवी संस्थेचे सचिव अभिजित सरकार यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com