मानवनिर्मित कुरण बनले वाघांचे आश्रयस्थान

पीटीआय
शुक्रवार, 12 मे 2017

उत्तराखंड वन विभागाच्या प्रयोगाला यश

हल्दवाणी: उत्तराखंडधील नैनिताल येथे सुमारे 60 हेक्‍टर परिसरात तयार केलेले मानवनिर्मित कुरण कुमाऊँतील अनेक वाघांचे आश्रयस्थान बनले असून, वाघांबरोबर येथे हत्ती तसेच, अन्य जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.

उत्तराखंड वन विभागाच्या प्रयोगाला यश

हल्दवाणी: उत्तराखंडधील नैनिताल येथे सुमारे 60 हेक्‍टर परिसरात तयार केलेले मानवनिर्मित कुरण कुमाऊँतील अनेक वाघांचे आश्रयस्थान बनले असून, वाघांबरोबर येथे हत्ती तसेच, अन्य जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.

तेराईच्या पूर्वेकडील जंगल परिसरालगत असलेल्या भागात हे कुरण तयार करण्यात आले असून, या कुरणात 39 प्रकारचे गवत आढळून येते. अशी माहिती वन विभागाचे संरक्षक पराग मधुकर धकाटे यांनी दिली. ते म्हणाले, या भागात वाढत असलेली वाघ आणि हत्तींची संख्या पाहता प्रायोगिक तत्त्वावर या कुरणाची निर्मिती करण्यात आली. दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण झाले. मार्जार कुळातील प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी आवश्‍यक ती सर्व उपकरणे येथे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

2016 मध्ये झालेल्या प्राणी गणनेनुसार, पश्‍चिम भागात 119 वाघ व 197 हत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने तयार केलेल्या कुरणात सध्या एक नर वाघ, मादी व त्यांचे दोन बछडे आढळून आले आहेत. यावरून हा प्रयोग यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. मुख्य उद्दिष्ट सफल होताच. याच परिसरात 38 हेक्‍टर जागेत दुसऱ्या एका कुरणाची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे धकाटे यांनी सांगितले.

सुरक्षित कुरणांची आवश्‍यकता
राज्यात वनसंवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर सरकारकडून बऱ्यापैकी निधी खर्च होत आहे. परिणामी, वाघ व हत्तींची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, याचे संतुलन बनवून ठेवायचे असल्यास त्यांच्यासाठी अशा प्रकारची मानवनिर्मित कुरणे तयार होणे गरजेचे आहे, असे मत वन विभागाचे संरक्षक पराग धकाटे यांनी व्यक्त केले.

Web Title: man made jungle and tigers