एकाच कुटुंबातील चार महिलांवर सामूहिक बलात्कार; एकाचा खून

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मे 2017

एकाच कुटुंबातील एका व्यक्तीची हत्या करून चार महिलांवर आज (गुरुवार) पहाटे  सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - एकाच कुटुंबातील एका व्यक्तीची हत्या करून चार महिलांवर सामूहिक आज (गुरुवार) पहाटे उशिरा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ग्रेटर नोएडाच्या जवळ असलेल्या जेवर येथून बुलंदशहरच्या दिशेने एक कुटुंब रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नातेवाईकाची भेट घेण्यासाठी स्वत:च्या मोटारीने प्रवास करत होते. दरम्यान आज (गुरुवार) पहाटे उशिरा लोखंडी रूळ त्यांची फेकून गाडी अडविण्यात आली. काय घडले आहे हे पाहण्यासाठी मोटारीतील काही जण बाहेर आले, त्यावेळी सहा सशस्त्र व्यक्तींनी त्यांना घेरले. मोटारीत बसलेल्या महिलांना बाहेर खेचण्यात आले. या प्रकाराला विरोध करणाऱ्या मोटारीतील 45 वर्षाच्या व्यक्तीची गोळी घालून हत्या करण्यात आली. चार महिलांवर बलात्कार करून लुटून आरोपी फरार झाले आहे.