Manipur : AFSPA बाबत भाजपने स्पष्ट केली भूमिका; मुख्यमंत्री म्हणाले...

मुख्यमंत्री एन बिरेन सिंग
मुख्यमंत्री एन बिरेन सिंगमुख्यमंत्री एन बिरेन सिंग

मणिपूरमध्ये (Manipur) भाजपच्या राज्यात पाच वर्षांत शांतता प्रस्थापित झाली आहे. ज्यामुळे भविष्यात सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा AFSPA रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आधी मुख्यमंत्री एन बीरेन सिंह म्हणाले. हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा भाजपने प्रचार आणि जाहीरनाम्यात AFSPA बाबत मौन बाळगल्याबद्दल टीका केली जात आहे.

म्यानमारशी आमची संवेदनशील सीमा आहे. त्यामुळे एएफएसपीए (AFSPA) मागे घेण्यापूर्वी केंद्राला स्वत:ला आश्वस्त करावे लागेल. त्यासाठी बंडखोर गटांशी शांतता चर्चा प्रक्रिया सुरू करावी लागेल. राज्य सरकारला ग्राउंड परिस्थिती बनवावी लागेल आणि गेली पाच वर्षे आम्ही या दिशेने काम करीत आहोत, असेही मुख्यमंत्री बीरेन सिंह म्हणाले.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंग
गृहमंत्री म्हणाले, रश्मी शुक्ला यांनी महत्त्वाच्या नंत्यांचे फोन टॅप केले

गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील सरकारने भविष्यात एएफएसपीए (AFSPA) रद्द करण्याचा पाया घातला आहे, असे शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एनडीटीव्हीशी बोलताना मुख्यमंत्री बिरेन सिंग म्हणाले. मणिपूरमध्ये (Manipur) २८ फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी (Assembly elections) आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी राज्यभरात त्यांच्या ट्रेडमार्कच्या छोट्या बैठका घेतल्या. ज्यात ते निवडणुकीच्या अजेंड्यावर मतदारांशी संवाद साधताना दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com