मणिपूरला भूकंपाचा सौम्य धक्का

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

चंडेल भागाला बसलेल्या या धक्क्यामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. आसाममधील काही भागांनाही भूकंपाचा धक्का जाणवला.

इम्फाळ - मणिपूरमधील चंडेल भागाला आज (शनिवार) पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

मणिपूरमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वीच आज पहाटे पाचच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजण्यात आली आहे.

चंडेल भागाला बसलेल्या या धक्क्यामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. आसाममधील काही भागांनाही भूकंपाचा धक्का जाणवला.