मराठीच्या अभिजात दर्जासाठी सर्वांनी प्रयत्न करावे- महाजन

पीटीआय
बुधवार, 22 मार्च 2017

नवी दिल्ली: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला आज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पाठिंबा दर्शवित यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे सांगितले.

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. मराठीत भाषण करीत ते म्हणाले, ""मराठीला तत्काळ अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. याबाबतचा प्रस्ताव व त्याबाबतचे सारे दस्तऐवज महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठविले आहेत.''

यावर मुळच्या महाराष्ट्रातील असलेल्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन मराठीतून म्हणाल्या,""यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितरीत्या प्रयत्न केले पाहिजेत.'' लोकसभेतील कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही हे मान्य असेल अशी पुस्तीही त्यांनी जोडली. खर्गे जरी कर्नाटकातील असले तरी उत्तम मराठी बोलतात. उपसभापती थंबी दुराई यांनीही या मागणीला सहमती दर्शविली.