'आधार'ची गोपनीय माहिती 200 सरकारी संकेतस्थळांवर उघड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारच्या जवळपास दोनशे संकेतस्थळांवर आधार लाभधारकांचे नाव आणि पत्ता सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध झाल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) आज कबूल केले. नागरिकांच्या या अधिकार भंगाबाबत दखल घेऊन ही माहिती संकेतस्थळावरून काढून टाकल्याचे या वेळी सांगण्यात आले.

याबाबत माहिती अधिकार कायद्याखाली विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला "यूआयडीएआय'कडून उत्तर देण्यात आले. "आमच्याकडून "आधार'मधील माहिती कधीही सार्वजनिक केली जात नाही. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या काही विभागांच्या 210 संकेतस्थळांवर आधार लाभधारकांची यादी त्यांच्या नाव, पत्ता आणि इतर माहितीसह प्रसिद्ध झाल्याचे लक्षात आले होते. या प्रकाराची नोंद घेऊन ही माहिती संबंधित संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आली आहे,' असे "यूआयडीएआय'ने म्हटले आहे.

आमच्याकडे अत्यंत सुरचित आणि अत्यंत सुरक्षित सुरक्षा यंत्रणा असून ती सातत्याने अद्ययावत ठेवत नागरिकांची गोपनीय माहिती जपून ठेवली जाते, असेही या वेळी सांगण्यात आले. कोणत्या कालावधीत संकेतस्थळांवर माहिती प्रसिद्ध झाली होती, हे मात्र "यूआयडीएआय'ने सांगितलेले नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com