'बिग बी' पुन्हा काँग्रेसच्या प्रेमात 

File photo of Amitabh Bachchan
File photo of Amitabh Bachchan

नवी दिल्ली : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरील सर्वाधिक ऍक्‍टिव्ह सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. मागील काही दिवसांपासून अमिताभ यांनी ट्‌विटरवर चक्क काँग्रेस नेत्यांना फॉलो करायला सुरवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अमिताभ यांचे काँग्रेसशी जुने नाते आहे; पण काही वादांमुळे त्यांनी काँग्रेसचा हात सोडला होता. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना फॉलो केल्यानंतर अमिताभ यांनी पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अहमद पटेल, अशोक गेहलोत, अजय माकन, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आणि सी. पी. जोशी यांनाही फॉलो केले.

काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेते मनीष तिवारी, शकील अहमद, संजय निरुपम, रणदीप सुरजेवाला, प्रियांका चतुर्वेदी आणि संजय झा यांनाही अमिताभ यांनी फॉलो केल्याचे आढळून आले आहे. 'बिग बीं'च्या या काँग्रेसप्रेमामुळे विरोधी पक्षनेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अन्य विरोधक 
अन्य विरोधी पक्षांकडेही अमिताभ यांचा ओढा दिसून येतो. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांची मुलगी मिसा भारती, संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 'आप' नेत्यांनाही अमिताभ फॉलो करू लागले आहेत. भाजपमधील नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू यांचेही अमिताभ हे फॉलोअर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com