अतिक्रमण कारवाईवरून 'आप'-भाजपमध्ये पुन्हा लढाई! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वादग्रस्त अतिक्रमण मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आज (मंगळवार) गदारोळ झाला. 'केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीदरम्यान आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली', असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून जागेचा गैरवापर करणाऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात दिल्लीतील महापालिकांनी कारवाई सुरू केली आहे. तसेच, रहिवासी जागेचा वापर व्यापारी हेतूंनी करणाऱ्यांविरोधातही महापालिकांची कारवाई सुरू आहे. दिल्लीतील व्यापाऱ्यांनी या कारवाईला विरोध केला आहे. यासाठी आकारला जाणारा दंड रद्द करावा, अशी मागणी सत्ताधारी 'आप'ने केली आहे. त्यावरून गेले काही दिवस 'आप' आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. 

या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. यासाठी भाजपच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. पण 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला. भाजपच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व मनोज तिवारी यांनी केले होते. या घटनेमुळे भाजपच्या नेत्यांनी ही बैठक अर्धवट सोडून निषेध व्यक्त केला. 

या बैठकीनंतर केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'ही बैठक पूर्ण होऊ शकली नाही. पण आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. ही कारवाई बंद व्हावी, अशी आमची मागणी आहे', असे केजरीवाल यांनी सांगितले.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news Arvind Kejriwal AAP Delhi sealing drive BJP