...तेव्हा शरद यादव कुठे होते : नितीशकुमारांची विचारणा

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

'जब हम अलग हो रहें थें एनडीए से 2013 में तो (शरद यादव) पार्टी के अध्यक्ष थे, क्युँ नही रोका था?', अशी विचारणा नितीश यांनी केली. 'अनेक लोकांना चुकीची माहिती आहे. जेडीयूला मोठा जनाधार आहे. जेडीयू ज्याच्या सोबत असेल, तो पक्ष निवडणूक जिंकतो,' असा दावाही त्यांनी केला.

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिक सहभागी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नितीशकुमार यांनी ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यावर टीका केली आहे. यादव यांनी 2013 मध्ये एनडीएमधून बाहेर पडताना का विरोध केला नाही, अशी विचारणा नितीश यांनी केली आहे.

'जब हम अलग हो रहें थें एनडीए से 2013 में तो (शरद यादव) पार्टी के अध्यक्ष थे, क्युँ नही रोका था?', अशी विचारणा नितीश यांनी केली. 'अनेक लोकांना चुकीची माहिती आहे. जेडीयूला मोठा जनाधार आहे. जेडीयू ज्याच्या सोबत असेल, तो पक्ष निवडणूक जिंकतो,' असा दावाही त्यांनी केला.

संयुक्त जनता दलाने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आज कार्यकारिणी बैठकीत घेतला. त्यानंतर नितीश पत्रकारांशी बोलत होते.

आधीची बातमी :
नितीश कुमारांचे 50 महिन्यांनंतर 'एनडीए'मध्ये कमबॅक!

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :