परिसंवादाच्या कार्यक्रमात "कॅण्डी क्रॅश' खेळताना आढळले पोलिस

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

अंमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात आयोजित एका महत्वाच्या परिसंवादाच्या वेळी दोन पोलिस अधिकारी मोबाईल फोनवर "कॅण्डी क्रॅश' गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पाटना (बिहार) - अंमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात आयोजित एका महत्वाच्या परिसंवादाच्या वेळी दोन पोलिस अधिकारी मोबाईल फोनवर "कॅण्डी क्रॅश' गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करी आणि संघटित गुन्ह्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवाय बिहारचे पोलिस महासंचालकही उपस्थित होते. मात्र, यावेळी उपस्थित असलेले दोन पोलिस अधिकारी त्यांच्या फोनवर ब्राऊजिंग करत असताना आणि "कॅण्डी क्रॅश' नावाचा मोबाईल गेम खेळत असताना आढळून आले. या प्रकाराबाबत बोलताना अतिरिक्त पोलिस महासंचालक एसके सिंघल यांनी नाराजी व्यक्त करत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून असा प्रकार अपेक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. "वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून असा प्रकार अपेक्षित नाही. आम्ही त्या अधिकाऱ्यांचे समुदेशन करू', असे सिंघल म्हणाले.