अहमदाबादेत पंधरा क्रुड बॉम्ब सापडले

वृत्तसंस्था
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

अहमदाबाद : अहमदाबादमधील दरियापूर भागात तब्बल पंधरा क्रुड बॉम्ब पोलिसांना सापडले. सर्व बॉम्ब निकामी करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबाद दौऱयाच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब सापडल्याने या घटनेला वेगळा अर्थ आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने एका स्थानिक टीव्ही वाहिनीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोट घडवून लोकांमध्ये भीती पसरवण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न होता. यासंदर्भातील अधिक तपशील मिळालेला नाही. 

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱयावर आहेत. अहमदाबादसह ते सुरेंद्रनगर आणि गांधीनगर जिल्ह्यात त्यांचे नियोजित कार्यक्रम आहे.