बालशोषणाचे 'व्हॉट्सअ‍ॅप रॅकेट' उद्ध्वस्त

Abuse
Abuse

कन्नौज - 'व्हॉट्सअ‍ॅप'वर चालविण्यात येणारे बाल लैंगिक शोषणाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सीबीआयने उद्ध्वस्त केले असून, या प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. सदर सूत्रधार बेरोजगार असून, तो उत्तर प्रदेशातील कन्नौजचा आहे. 

माहिती-तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार नोंदविल्यानंतर सीबीआयने दिल्ली, मुंबई, कन्नौज आणि नोयडातील पाच ठिकाणांवर छापे टाकले. अटक करण्यात आलेल्या सूत्रधाराचे नाव निखिल वर्मा असे असून, तो वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. तसेच, या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर असलेल्या सर्व सदस्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अमेरिका, चीन, न्यूझीलंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्राझील, केनिया, नायजेरिया आणि श्रीलंका या देशांमधील 119 मेंबर्स असल्याचे आढळले.

सीबीआयने छापे टाकले असता मोबाइल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क आणि अन्य डिजिटल उपकरणे हस्तगत केली आहेत. वर्मा याच्यासह नफीस रेझा आणि झाहीद (दिल्ली), सत्येंद्र ओमप्रकाश चौहान (मुंबई) आणि आदर्श (नोएडा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com