''ब्ल्यू व्हेलबाबत मुलांकडे लक्ष द्यावे''

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने पालकांना आणि शिक्षकांना यासंदर्भात दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. या खेळामुळे आपला पाल्य कोणतीही विचित्र कृती करीत नाही ना याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. 

ब्ल्यू व्हेल खेळ हा इंटरनेटवरचा वादग्रस्त खेळ असून, 50 दिवस तो खेळाडूला देतो आणि शेवटच्या क्षणाला आत्महत्येस प्रवृत्त करतो. खेळाडूला विविध पातळ्यावरील खेळ पूर्ण करण्यास सांगून त्याला आपला फोटो सोशल मीडियावर टाकण्यास सांगितले जाते. संपूर्ण देशात आत्तापर्यंत 12 ते 19 वयोगटातील सहा मुलांनी गेल्या 15 दिवसांत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियाद्वारे हा खेळ मोठ्या प्रमाणात सर्वत्र परसत आहे. 

जर कोणी वेगळ्या प्रकारचे वर्तन करीत असेल तर पालक, शिक्षक, मुलांनी आणि अन्य संबंधितांनी त्याच्याकडे बारीक लक्ष द्यावे, कारण आपला मुलगा हा ऑनलाइन खेळ खेळत नाही ना, याची काळजी घ्यावी, असे बालहक्क संरक्षण आयोगाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.