दिल्लीत बलात्कार करून तरुणीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : वीस वर्षांच्या युवतीवर बलात्कार करून तिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली. गेल्या गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असून त्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

दिल्लीतील बेगमपूर भागात ही घटना घडली. पीडित महिलेची प्रकृती स्थिर आहे; पण पोलिसांनी अद्याप तिचा जबाब नोंदविलेला नाही. 

ही पीडित तरुणी तिचा मित्र, तिची मैत्रिण आणि आणखी एका मित्राबरोबर बाहेर गेली होती. रात्री उशीरा परतताना 22 वर्षीय आरोपीने पीडित तरुणीला घरी सोडण्याची तयारी दर्शविली. यासाठी त्याच्या घरून गाडी घ्यावी लागेल, असे त्याने सांगितले. त्या तरुणीची मैत्रिण आणि तिच्या मित्राने रिक्षाने घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच रस्त्यावरील काही जणांची धावपळ सुरू झाल्याचे त्यांना दिसले. 'एका इमारतीवरून एका तरुणीला खाली फेकले आहे' अशी माहिती त्यांना चौकशी केल्यावर मिळाली. 

पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्या तरुणीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, त्या आरोपीने तरुणीवर बलात्कार करण्यास सुरवात केली. तिने विरोध केल्यानंतर त्याने चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. या वेळी आरोपीबरोबर आणखी एक इसमही उपस्थित असल्याचा दावा त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकालाच अटक केली आहे.