कोण ठरेल आजचा मॅन ऑफ द मॅच?

Marathi News Election 2017 Himachal Pradesh Gujarat Man of the Match
Marathi News Election 2017 Himachal Pradesh Gujarat Man of the Match

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मॅचचा मध्यानः झाला असून भाजपने आपले अधिकृत खाते उघडले आहे. गुजरातमध्ये अहमदाबादहून राकेश शाह व राजकोटहून विजय रुपाणी यांच्या रुपाने दणक्यात विजय प्राप्त केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेहसना या जिल्ह्यात काँग्रेसने आघाडी कायम केली आहे. या जिल्ह्याचा निकाल आला नसला तरी नरेंद्र मोदी यांना घरच्या भूमिवर काँग्रेसकडून पराभव स्विकारावा लागेल की काय? याकडे सर्वांचे लक्षं लागले आहे. 

इकडे संसदेत नरेंद्र मोदी यांनी विजयाचा आनंद मिडीयासमोर विजयी मुद्रेने व्यक्त केला. तर अजूनही काँग्रेसकडून मात्र गुजरातेत 60 जागांची समीकरणं बदलली आहेत. काँग्रेसने यावेळी आपली जागा मजबुत करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नव्हती. त्यामुळे ही समिकरणं तयार होऊ शकली. हिमाचलमध्ये सध्या 44 जागांवर व गुजरातेत 100 जागांवर भाजप आघाडीवर आहे. 

वडगाम येथील जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकुर या तरुण नेत्यांच्या निकालानेही सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज सकाळपर्यंत काँग्रेस आणि सकाळ ओसरत येत आहे तर आता भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. काँग्रेसची भाजपला मिळत असलेली टक्कर या सगळ्या चुरशीत आजचा मॅन ऑफ द मॅच मॅच नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यापैकी कोण ठरेल? याचा निकालही औत्सुक्याचा असेल, हे नक्की.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com