पंचकुलामध्ये तीन भावंडांची हत्या; आरोपी पित्यासह चुलत्याला अटक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

चंडीगड : कुरूक्षेत्रमध्ये तीन भावंडांची हत्या करणात आली. हत्येनंतर बालकांचा मृतदेह पंचकुलातील मोरनी जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्या भावंडांच्या पित्यासह चुलत्याला अटक केली. ही हत्या विवाहबाह्य संबंधातून झाल्याची माहिती मिळत आहे. 

समीर (11), सिमरन (8), समर (3) अशी हत्या करण्यात आलेल्या बालकांची नावे आहेत. या बालकांचे कुटुंबीय कुरुक्षेत्र जिल्ह्यातील सारसा गावात वास्तव्यास आहे. या बालकांची हत्या रविवारी करण्यात असून, त्यांचे मृतदेह मंगळवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले आहेत. या हत्येप्रकरणी पोलिसांनी जगदीप मलिक (26), त्याचा चुलत भाऊ आणि त्या बालकाचे पिता सोनू मलिक याला अटक केली आहे. आरोपी सोनू मलिक याचे कायथळ येथे फोटो स्टुडिओ असल्याचे सांगितले जात आहे. 

सोनू मलिकचे वडील जीता मलिक म्हणाले, सोनू मलिकचे हिमाचल प्रदेशमधील एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. तो त्या महिलेशी विवाह करणार होता. यावरून सोनू आणि आमच्यामध्ये गेल्या 10 महिन्यांपासून वाद सुरु होता. त्यानंतर आम्ही त्याची समजूतही काढली. आपल्या मुलांखातर त्या महिलेला सोडावे, असेही सांगितले होते. या हत्येमागे नेमके हेच कारण असल्याची शक्यता आहे. 

याबाबत कुरुक्षेत्र पोलिस अधीक्षक अभिषेक गर्ग म्हणाले, जगदीप आणि सोनू या दोघांनी गुन्हा कबुल केला असून, गुन्हाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, त्याच्या कुटुंबीयांकडून ही हत्या विवाहबाह्य संबंधातून झाल्याचे सांगण्यात आले आहे. या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रास्त्रे अद्याप हस्तगत करण्यात आलेले नाही. 

यादरम्यान सीसीटीव्ही चित्रीकरण दाखवल्यानंतर आरोपी सोनू मलिक कोणत्याही प्रकारे दु:खी दिसत नव्हता. तसेच त्याचा स्वभावही विचित्र वाटत होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता या दोघांनी गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांनी सोनू आणि जगदीप या दोघांवर कलम भारतीय दंडसंहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com