गोव्यात बालगोपाळांनी लुटला चित्रकला स्पर्धेचा आनंद

goa
goa

पणजी : दैनिक "गोमन्तक' आणि "सकाळ'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बालगोपाळांनी स्पर्धेचा आनंद लुटलाच, शिवाय त्यांच्या पालकांनीही स्पर्धा केंद्रावर गर्दी करीत आपल्या पाल्यांना प्रोत्साहन तर दिलेच आणि स्पर्धेसाठी सहकार्यही केले. 

गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हरमल केंद्रावर उपस्थिती लावून  बालगोपाळांचा आनंद द्विगुणीत केला. स्पर्धकांचा आत्मविश्‍वास दुणावेल असे प्रबोधनही त्यांनी केले. गोमन्तक आणि सकाळने वृत्तपत्राच्या  माध्यमांद्वारे समाज प्रबोधन चालवले आहे, सामाजिक उपक्रमही सुरू आहेत. मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे व्यासपीठ देऊन त्यांच्या  हस्तकौशल्याला वाव देण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे. मुलांनी अभ्यास करायलाच हवा. त्यांच्यातील कलागुणांमधूनही मोठे चित्रकार घडू  शकतात. प्रत्येकाची गुणवत्ता वेगळी असते. ज्याची त्याची शैली निराळी असते. लाखो मुलांना त्यांच्यातील अभिरूची कागदावर चित्रबध्द  करण्याची संधी देणे हा चांगला उपक्रम आहे, असे प्राचार्य पार्सेकर म्हणाले. 

गोमन्तक आणि सकाळची चित्रकला स्पर्धा मुलांच्या कलागुणांना वाव देणारी आहे. यातून भविष्यात मोठा कलाकार निर्माण होऊ शकतो.  मुलांनी आपल्यातील बुध्दिकौशल्य आणि विचार कुंचल्यात उतरवले की त्यातून तयार होणारे चित्र हे त्यांच्यातील आविष्काराचा अंदाज देते.  अशी संधी उपलब्ध करणे हे मुलांना प्रोत्साहन देण्याचे मोठे कार्य आहे. 
- प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री आणि अध्यक्ष- हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्था 

मुलांमधील चित्रकार शोधण्याचे आणि त्यांना नवीन विषय देत चित्रातून बोलते करण्याचे गोमन्तक आणि सकाळचे कार्य खरोखरच  वाखाणण्यासारखे आहे. 
- सौ. स्मिता पार्सेकर,  मुख्याध्यापक, हरमल पंचक्रोशी हायस्कूल 

मुलांना गोमन्तकच्या चित्रकला स्पर्धेसाठी घेऊन आलो आहे. मुलांना अशी संधी मिळणे म्हणजे त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन.  गोमन्तकचे अभिनंदन. 
- श्री. महेश राजाराम मांद्रेकर (पालक), सांगोल्डा- बार्देश 

चित्रकला स्पर्धेतून मुलांच्या मनातील भावना व्यक्त होतात. चित्रांमधून ते आपली अभिरूची जोपासण्याचा प्रयत्न करतात. 
- श्री. अतुल नाईक (पालक तथा छायाचित्रकार) म्हापसा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com