गुजरातमध्ये चुरशीची लढत, निवडणूकीचे विश्लेषण करू

Kailash vijayvargiya
Kailash vijayvargiya

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरच्या मैदानात म्हणजेच गुजरातमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर' होताना दिसत आहे. त्यामुळेच सत्ताधारी गुजरातमध्ये निकालासंबंधी हे नक्की काय होत आहे? याबाबत भाजप विश्लेषण करेल व यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले. 

'आम्ही आमचा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवू शकत नाही, त्यामुळे कधीतरी असे होते. पण इतक्या लवकर काही बोलणे चुकीचे ठरेल.' असेही ते यावेळी म्हणाले. गुजरातमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण आता भाजपचा विजय होईल व कमी फरकाने भाजप सत्तेत येईल. 

सौराष्ट्रात जिथे पटेल व पाटीदार समाजाचे वर्चस्व आहे अशा मतदार संघात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. पटेल व पाटीदार समाजाने आरक्षणाच्या व नोकरीच्या मुद्द्यावर जोरदार आंदोलने केली होती. त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात होता व त्यांच्या पराभवाची इच्छा व्यक्त करत होता. या आंदोलनाचे नेतृत्व करणारा चेहरा हार्दीक पटेल याने काँग्रेसला पाठींबा दर्शविला. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे सौराष्ट्रातील राजकोट येथून निवडून आले. याआधी मोदींनी देखील आपली पहिली निवडणूक इथूनच लढवली होती व ते विजयी झाले होते. रूपाणींच्या विरोधात काँग्रेसचे इंद्रनील राजगुरू हे निवडणूक लढवत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com