रेल्वेने घेतली जगातील सर्वांत मोठी ऑनलाईन परीक्षा

पीटीआय
शनिवार, 8 जुलै 2017

नवी दिल्ली : रेल्वेने विविध पदासांठी भरतीप्रक्रियेसाठी प्रथमच ऑनलाइन परीक्षा घेतली. त्यामुळे तब्बल चार लाख झाडे आणि तब्बल 319 कोटी कागदांच्या शीटसची बचत झाली आहे. चौदा हजार रिक्त पदांसाठी 351 केंद्रावर तब्बल 92 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. जगातील ही सर्वांत मोठी ऑनलाइन परीक्षा असल्याचा दावा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 

प्राथमिक, लेखी व बुद्धिमापन अशा तीन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात आली.

गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने रेल्वेने यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. यात एकूण 92 लाख उमेदवारांपैकी दोन लाख 73 हजार जण प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांना सहायक स्टेशन मास्तर व लिपिक पदांसाठी झालेल्या ऑनलाइन लेखी परीक्षेसाठी या वर्षी 17 ते 19 जानेवारी दरम्यान बोलाविण्यात आले. अंतिम परीक्षेसाठी 45 हजार जण पात्र ठरले. 29 व 30 जूनला त्यांची मानसिक व टंकलेखन कौशल्याची चाचणी घेण्यात आली. डिजिटल क्रांतीमुळे या दोन्ही चाचण्या एकाच दिवशी झाल्या. पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेतली असती तर यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला असता, असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

ऑनलाइन परीक्षेमुळे मोठ्या प्रमाणात वेळ व पैशांची बचत झाली. त्याचप्रमाणे भरतीप्रक्रिया पारदर्शकरीत्या झाल्याचे त्याने स्पष्ट केले. यापूर्वी पेपरफुटीच्या घटना घडल्यामुळे रेल्वेने यंदा ऑनलाइनच पद्धती स्वीकारली. या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वेने उमेदवारांना त्यांची उत्तरपत्रिका पाहण्याचीही व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यातून निवड झालेल्या 14 हजार पात्र उमेदवारांना सप्टेंबरमध्ये कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले असून यावर्षी दिवाळीच्या आधि त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

  • रिक्त पदे - 14,000 
  • परीक्षा केंद्रे - 351 
  • उमेदवार संख्या - 92 लाख 
  • निवड झालेल्यांची संख्या - 14 हजार