हाफिज सईदची सुटका होणार; पाकिस्तानच्या न्यायालयाचे आदेश

hafeez
hafeez

नवी दिल्ली : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जमात-उद-दवाहचा म्होरक्या हाफिज सईदची सुटका करण्याचे आदेश पाकिस्तानच्या न्यायालयाने बुधवारी दिले आहेत. हाफिज सईद याची कोणत्याही खटल्यात गरज नसल्याने न्यायालयाने त्याची सुटका केल्याचे सांगितले जात आहे. 

लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बोर्डाने हाफिज सईदला आणखी तीन महिने शिक्षा मिळावी, अशी विनंती पाकिस्तानातील पंजाब सरकारला केली होती. न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत सईदच्या सुटका करा, असे आदेश दिले आहेत. 

पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, ''पाकिस्तानकडून आता पुन्हा एकदा मूर्ख बनवण्यात येत आहे. हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आल्याने अमेरिकेने आता यामध्ये लक्ष द्यायला हवे".

दरम्यान, सईद आणि त्याच्या चार साथीदारांना मागील महिन्यात बोर्डाने 30 दिवसांच्या तुरुंगवासात वाढ केली होती. ही मुदत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com